‘वीरश्रेष्ठा! भिऊ नकोस. माझं तुला अभय आहे. हे सुकुमारा! आपली कुवत लक्षात घेऊन वैरी पत्करावा. या भयाण रणांगणावर असा एकाकी फिरू नकोस. युद्धाची मौजच पाहायची असेल, तर तुझे भ्राते भीम, अर्जुन यांच्या निवाऱ्यान जा. सुखानं आपल्या शिबिरात परत जा.’ नकुलाच्या गळ्यात अडकवलेले आपले धनुष्य कर्णाने काढून घेतले आणि नकुलाच्या नेत्रांतले अश्र् पाहावे लागू नयेत, म्हणून तो माघारी रथाकडे वळला.