‘पण ते अंध...’ कृष्ण म्हणाला. ‘अंध असल्यामुळं राज्याचा अधिकार नष्ट होत नाही. तसं असतं, तर पंडूंनी जे राज्य सांभाळलं, ते राज्य अंध तातांच्या हाती देऊन, मृगयेच्या निमित्तानं वनवास गाठला नसता. कृष्णा, नम्रतेनं सांगावंसं वाटतं. गोकुळात नंदाची निवड केली जाते, त्या पद्धतीनं राज्याचा वारस निवडला जात नाही. शतकौरव असले, तरी साम्राज्याचे शत तुकडे पडत नाहीत. ते एकसंधच राहतं.’ ‘हो ना! मग त्या शतकौरवांच्या पोषणाची जशी कौरवसाम्राज्याची जबाबदारी आहे, तशीच त्याच कुलात जन्मलेल्या पाच पांडवांचीही.’ ‘पाच पांडव!’ दुर्योधन हसला. ‘कृष्णा, या राजसभेतल्या अनेक श्रेष्ठांना तुझ्या सामर्थाचं कौतुक वाटतं. ते तुला
...more