‘काय करू? पांडवांशी सख्य कर. ते तुझे भ्राते आहेत. तू नुसता कुन्तीपुत्र तू ज्येष्ठ कौंतेय आहेस. तुला स्वीकारण्यात पांडवांना धन्यता लाभेल. एका संयमी मातेला सुख लाभेल. कृष्णाला अत्यानंद होईल. मी सदैव शमाची इच्छा बाळगली, ती तुझ्या हातून पुरी होऊ दे. बाबा, रे, माझ्याबरोबरच या वैराची समाप्ती होऊ दे आणि सर्व राजे निरामय होऊन स्वगृही परतू देत.’ ‘आणि धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन... त्याची वाट कोणती?’ कर्णाच्या आवाजात रूक्षता प्रगटली. ‘अं!’ ‘पितामह, ज्यानं माझ्या भरवशावर हे युद्ध उभं केलं, त्या दुर्योधनाला कोणती वाट मिळेल? मी पांडवांना मिळालेलं कळताच त्या माझ्या मित्राची उभ्या जागी छाती फुटेल. माझ्या जीवनात
‘काय करू? पांडवांशी सख्य कर. ते तुझे भ्राते आहेत. तू नुसता कुन्तीपुत्र तू ज्येष्ठ कौंतेय आहेस. तुला स्वीकारण्यात पांडवांना धन्यता लाभेल. एका संयमी मातेला सुख लाभेल. कृष्णाला अत्यानंद होईल. मी सदैव शमाची इच्छा बाळगली, ती तुझ्या हातून पुरी होऊ दे. बाबा, रे, माझ्याबरोबरच या वैराची समाप्ती होऊ दे आणि सर्व राजे निरामय होऊन स्वगृही परतू देत.’ ‘आणि धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन... त्याची वाट कोणती?’ कर्णाच्या आवाजात रूक्षता प्रगटली. ‘अं!’ ‘पितामह, ज्यानं माझ्या भरवशावर हे युद्ध उभं केलं, त्या दुर्योधनाला कोणती वाट मिळेल? मी पांडवांना मिळालेलं कळताच त्या माझ्या मित्राची उभ्या जागी छाती फुटेल. माझ्या जीवनात मला फक्त एकच जिव्हाळा, एकच धन लाभलं, ते म्हणजे मित्रप्रेम. त्या प्रेमाला मी तडा जाऊ देणार नाही. यापुढं माझं जीवन मला तृणमात्र वाटतं’ भीष्मांनी काही क्षणांची विश्रांती घेतली आणि ते म्हणाले, ‘धन्य आहेस, कर्णा! तुझी मित्रनिष्ठा पाहून मी खरोखरीच धन्य झालो. माझा तुला आग्रह नाही. इतक्या सहजपणे निष्ठेची उकल मलासुद्धा करता आली नाही. अंधळ्या प्रीतापेक्षा डोळस प्रीतीनंच आम्ही आकर्षित झालो. पंडूबद्दल वाटणारा जिव्हाळा मनातून दूर झाला नाही. पुढ पंडुपुत्र आले. पितृछत्र हरवलेल्या मुलांची आम्हांला अनुकंपा वाटली. ज्याचा आश्रय धरला, त्याच्याकडं दुर्लक्ष झालं. पंडुपुत्रांचं रक्षण करण्यासाठी अधिक दक्षता बाळगली आणि त्यातून नकळत द्वेषभाव निर्माण झाला. कर्तव्यनिर्णयानं आम्ही सदैव अंधळ्या निष्ठेला बद्ध राहिलो. पण नुसत्या कर्तव्यापुरतेच. यांतली भक्ती कोणती, निष्ठा कोणती, याचा निर्णय करता आला नाही. मी दुर्योधनाचं काही प्रिय करू शकलो नाही. निदान तुझी निष्ठा तरी त्याला सुख देऊ दे. तुझं जन्मरहस्य कळूनही, तू ज्या...
...more
This highlight has been truncated due to consecutive passage length restrictions.