‘तुला अहंकारी, अभिमानी म्हणून मी नेहमीच दूषणं देत असे; पण त्या नाही. दूषणांना फारसा अर्थ नव्हता. वीराला नुसतंच कवच आणि शिरस्त्राण असून चालत नाही अभेद्य मनाची गरज असते. अभिमान, अहंकार, ईष्य ही वीराची खरी कवचं. वीराच्या ठायी प्रगटणारे हे गुण शत्रूंना नेहमीच दुर्गुण वाटतात. अरे वत्सा, मीही क्षत्रियच आहे. माझ्यासारखा अजोड योद्धा या पृथ्वीतलावर नाही, हा अहंकार मीही बाळगतो. त्या अहंकाराला डिवचण्याचं सामर्थ्य फक्त तुझं होतं तुझ्या रूपात होतं त्यामुळं माझा मत्सर भडकत असे. तुझ्या ध्यानी यायला हवं होतं. मी केलेला तुझा अपमान हा खरा तुझा सन्मान होता.’