‘वृषाली, असलं वेडेपण मी तुझ्यावडून अपेक्षिलं नव्हतं, तुझी-माझी सोबत असल्या मृत्युनं तुटणारी नाही. ती अखंड राहील. वेडे, उजव्या हाती शस्र पेलून मृत्यूचं आह्वान स्वीकारीत शत्रूला भिडत असता, वीराचा डावा हात वमरेच्या शेल्याचा आधार शोधीत असतो. पती, पत्नी ही का दोन रूपं? दोन भिन्न रूपांत काया, वाचा, मनानं गुंतलेला एकच आत्मा असतो, म्हणून तर पत्नीला अर्धांगी म्हणतात. आज मृत्यूचं भय न बाळगता मी रणांगणी जातोय्. म्हणूनच मी तुला आवडतोय् ते भय बाळगून मी घरी बसलो, तर तुला माझ्याकडं पाहवणारही नाही. खोटया भीतानं तू व्याकुल होऊ नकोस.’