‘मैत्री!’ कर्ण उसळला, ‘आचार्य, मैत्री काय असते, माहीत आहे? प्रत्येक पूजेबरोबर बदलणाऱ्या मंत्राइतकी मैत्री अस्थिर नसते. निदान तुम्ही तरी मैत्रीचा उच्चार करू नका. तुमची अन् दुपदाची मैत्री सर्वांना माहीत आहे. एकाला राजैश्वर्याचा अहंकार, तर दुसऱ्याला ज्ञानाचा विश्वास. खडग म्यानयुक्त असतं, तरी जेव्हा खडूगाला प्रगटावं लागतं, तेव्हा आवरण फेकूनच द्यावं लागतं त्या आवरणार्च अन् खडूगाचं साहचर्य असतं, म्हणून कुणी त्याला मैत्री समजू नये. मैत्रीचा अर्थ तुम्हांला कधी कळला नाही. दुपदाबद्दल स्नेह असता, तर मित्रानं केलेली चूक क्षम्य ठरली असती. पण तिर्थ उद्भवला अपमान, खोटा अहंकार, अन् त्याच अहंकारापोटी आपलं तेज,
...more