Saurabh L

33%
Flag icon
‘काका, तातांनी सांगितल्यप्रमाणं तुम्ही इंद्रप्रस्थाला जा. सम्राट युधिष्ठिरांना सर्व सांगा. द्यूताचं आमंत्रण द्या. त्यांना म्हणावं, यज्ञ हे निमित्त आहे. द्यूत हे आह्वान आहे. यज्ञभूमीतल्या सुग्रास भोजनासाठी त्यांना बोलावलं नसून, द्यूत खेळण्यासाठी त्यांना पाचारण केलंय्. त्यांना सांगा, म्हणावं, सुबलपुत्र गांधारदेशाधिपती शकुनि महाराज द्यूताला बसणार आहेत. अक्षविद्येत निपुण अशी त्यांची कीर्ती आहे. ते कृतहस्त म्हणजे आपल्या इच्छेनुसार फासे टाकण्यात निपुण आहेत. अतिदेवी-म्हणजे मर्यादेचं उल्लंघन करून द्यूत खेळणारा- असाही त्यांचा लौकिक आहे. त्यांच्याबरोबर द्यूत खेळणं म्हणजे साक्षात पराजय भोगणं. हे सारं ...more
राधेय
Rate this book
Clear rating