‘आज्ञा! देवा, आपण आपल्या तेजानं पृथ्वी प्रकाशमान करता. त्या प्रकाशात जशी पुण्यकर्मं घडतात, तशीच पापकर्मंही; पण ती पापं घडतात, म्हणून आपण आपल्या प्रकाशाला कधी आवर घातलात का? याचकाला देणं एवढंच माझ्या हाती आहे. ते कोणा, कशासाठी वापरतं, याचा विचार करण्याचा मला अधिकार नाही. तो माझा धर्मही नव्हे.’ ‘तुझ्या बोलण्यानं मी तुझ्यावर प्रसन्न आहे. क्षणभर तू माझं देवत्व विसर; पण एक गोष्ट लक्षात घे. मी असतो आकाशी अन् कर्म घडतं पृथ्वीवर. त्या पापपुण्यांचा मला स्पर्श नसतो. पण कुणी माझं तेज मागितलं, तर ते मी कदापिही देणार नाही. कारण तसं झालं, तर त्या वेळी मी सूर्य राहणार नाही. मी त्या तेजाला बद्ध आहे, तसाच तूही
...more