‘राज्य वाटून देऊन शत्रू तृप्त होत नसतात, पण तुम्हांला तसं वाटलं. कुरुसाम्राज्याची प्रतिष्ठा असा लौकिक असणारी ही हस्तिनापूर नगरी. शत्रूंना भयभीत करणारी, वीरांना आह्वान देणारी तुमच्या खोट्या स्वप्नापायी या नगरीला निस्तेज, निष्प्रभ करून टाकलंत. ज्या नगरीच्या आश्रमांतून शस्रविद्येचे धडे दिले जायने, भूमिरक्षणार्थ वीर तयार व्हावयाचे, जी भूमी खऱ्या अर्थानं वीरप्रसू बनायची, त्या आश्रमांतून तुमची ज्ञानगंगेची सत्रं सुरू झाली. जितेपणी मृत्यूनंतरच्या स्वर्गाची चित्रं रंगविण्यात वीरांची मनं रमली. रथशाळांतून नवे नवे तेजस्वी रथ निर्माण होण्याऐवजी त्या निष्णात कलावंतांकडून शत्रूची घरंदारं उभी केलीत. ज्या मत्त
...more