‘वीरहो! मी असं ऐकलंय् की, पुण्यसंचयासाठी यज्ञ योजला जातो, तेव्हा यज्ञाचा नाश करण्यासाठी दुष्ट राक्षस आकाशातून अवतरतात. त्या यज्ञभूमीचा नाश करतात; पण आज ते खोटं असावं, असं वाटतं. यज्ञामध्ये मंत्रोच्चाराबरोबर जी तुपाची धार धरली जाते, यज्ञकुंडात जी सुगंधी काष्ठं प्रज्वलित होतात, त्या समिधा अग्निरूप घेत असतात. धुराचे लोट उठतात. त्यातूनच अहंकाराचे राक्षस उद्भवतात. वासनेची आसक्ती, ऐश्वर्याचा मद अन् सत्तेचा अहंकार यांनीच तुमच्या ज्ञानयज्ञाचा नाश झाला आहे, हे सत्य इथं बसलेल्या द्रोणाचार्यांनी, कृपाचार्यांनी तुम्हांला सांगायला हवं होतं, पण ज्यांच्या विवेकावर दास्याची पुटं चढली आहेत, त्यांची जिव्हा हा
...more