‘युवराज! भर मध्याहृकाळी सूर्यास्त होताना कधी तुम्ही पाहिलात का?’ दुर्योधनाने भीतीने आकाशातल्या सूर्याकडे पाहिले. सूर्य तळपत होता. त्याचा दृष्टी कर्णाकडे वळली. कर्णाचे डोळे तसेच उघडे होते. सूर्यबिंबाकडे पाहत. दुर्योधनाची मान खाली झाली. कर्णाने मिटलेली उजवी मूठ उघडली होती... दुर्योधनाचे अश्रु त्या हातावरून ओघळत होते. कर्णाच्या उघड्या तळहातावर पडणारे अश्रु जमिनीकडे ओघळत होते. - जणू त्या मोकळ्या हाताने कर्ण शेवटचे दान देत होता.