‘राधेया... सूतपुत्रा... उद्या रणभूमीवर तुला एवढे कष्ट पडणार नाहीत. स्वगृही जाऊन विश्रांती घे, पृथ्वीतलावरची शेवटची विश्रांती मनसोक्त भोग.’ हेच ते शब्द. शस्त्रस्पर्धेच्या वेळी याच भीमाने असाच उपहास केला होता. वयाबरोबर रूपात फरक पडला, पण वृत्ती तीच राहिली- असंयमी, संतापी, गर्विष्ठ.