‘नुसत्या उदात्त कल्पना बाळगून वास्तवात जगता येत नाही, युवराज!’ विदुर म्हणाला, ‘अजूनही वेळ गेलेली नाही. भगवान श्रीकृष्ण तुमच्या निरोपाची वाट पाहत आहेत. पांडव आता राज्यही मागत नाहीत. त्यांना फक्त पाच गावं हवी आहेत.’ ‘याचक म्हणून नव्हे. विदुरकाका, ते मागतात दायाद म्हणून. कौरवसाम्राज्याचे वारस म्हणून. एकदा ती चूक केलीत अन् पांडवांची मजल तात जिवंत असता राजसूय यज्ञ करण्यापर्यंत गेली. तुम्हांला सवड असेल, पण परत ते पाहण्याचं बळ मला नाही.