‘प्रजापालन हा सम्राटपदाचा प्रथम गुण. सम्राटांना प्रजा ही मुलासारखी. तुमच्या मनात पांडवांबद्दल वैरभाव असेल; पण ज्या क्षणी ते द्यूतात हरले, दास बनले, तेव्हा ते तुमचे प्रजानन झाले नाहीत का? ही द्रौपदी दासीच नव्हे, प्रजानन आहे, हे तुमच्या कुणाच्याच कसं ध्यानी आलं नाही? जे सम्राट प्रजेला नग्न करू इच्छितात, ते सम्राट कसले?’