Saurabh L

35%
Flag icon
द्रौपदी दासी बनली असली, तरी ती स्त्री आहे, हे इथं बसलेल्या राजसभेला अन् त्या सभेतल्या धर्मगुरूंना विसरता येणार नाही. जी मर्यादा आपण सहज ओलांडलीत, ती ओलांडून निदान आम्हांला तरी जमणार नाही. ती अमर्यादा आहे.’ कर्णाकडे पाहत विदुर म्हणाले, ‘या जगात राज्य देऊन कुणी राजा होत नाही, ना राज्य हिरावून घेऊन कुणी दास. द्रौपदी ही जन्मजात राजकन्या असून, इंद्रप्रस्थाची महाराणी आहे’ मर्माघात झालेला कर्ण त्या शेवटच्या वाक्याने अधिकच संतापला. आसनावरून खाडकन उठून तो गरजला, ‘कोण महाराणी? द्रौपदी? मग राजमाता गांधारीदेवी कोण? कौरवकुलाचं अमात्यपद भोगणाऱ्या विदुरांना सम्राट धृतराष्ट्रमहाराजांचा विसर पडलेला दिसतो. ...more
राधेय
Rate this book
Clear rating