राधेय! हे कर्णचरित्र नव्हे. प्रत्येकाच्या मनात एक दडलेला कर्ण असतो. माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी. भावकहाणी. याची सत्यता शोधायची झाली, तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही. कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल.