‘कर्णा, आता निरोप दे.’ ‘आपल्याबरोबर मी थोडं अंतर येतो ना!’ ‘नको! नरोप कधीही मंद गतीनं घेऊ नये. त्यानं दु:ख वाढतं. निरोप शक्य तेवढ्या लौकरच संपवावा. तुम्ही प्रासादाच्या द्वारीही येऊ नका. इथंच उभे राहा. तुझा निरोप घेत असता बराच काल तुम्हांला पाहता येईल. मग मी येऊ?’