‘सन्मान? या पांडवांचा?’ दुर्योधन उसळला, ‘या द्यूतानं त्यांचा योग्य तो सन्मानच केलाय्. घरी आलेल्या अभ्यागताला कसं वागवावं, हे त्यांनीच मला शिकवलंय्. राजसूय यज्ञाच्या प्रसंगी यांनी उभारलेली मयसभा आमच्याइतकी दुसऱ्या कुणी उपभोगली? आमचा अपमान करताना घरी आलेल्या अभ्यागताची जाणीव यांना नव्हती? अन्, विदुरकाका, हे लक्षात ठेवा की, इथं पांडव जरूर आमंत्रित आहेत; पण ते आमच्या पाहुणचारासाठी नव्हे... द्यूतासाठी! तुमच्याकरवीच दिलेलं द्यूताचं ते आह्वान स्वीकारून ते इथं आलेले आहेत. शकुनि अक्षविद्येत निपुण आहेत, हे त्यांना तुम्हीच सांगितलं होतं ना? ज्वाला चुकविण्यासाठी भुयारं खोदता येतात, पाण्यावर तरंगण्यासाठी
...more