‘मला ते सामर्थ आहे. मी एकटा दिग्विजय करून कौरवांची रत्नघरं परत समृद्ध करीन.’ ‘केव्हा?’ भीष्मांनी विचारले. कर्णाने आपली दृष्टी पितामहांच्या दृष्टीला खिळवली. तो म्हणाला, ‘पितामह! पराक्रमाच्या लालसेनं नव्हे, तर मित्राचा कलंक धुऊन काढण्यासाठी मी लवकरच दिग्विजयासाठी बाहेर पडेन. पांडवांच्या राजसूयापेक्षाही भव्य असा यज्ञ पार पाडून दाखवीन. एकच विनंती आहे. ज्या वेळी मी दिग्विजयावरून परत येईन, तेव्हा आज माझ्या निर्भर्त्सनेसाठी जशी राजसभा आयोजित केलीत, तशीच राजसभा माझ्या स्वागतासाठी आयोजित करा. या राजसभेत परत येईन, तो सन्मान भोगण्यासाठीच येईन. येतो मी!’ ‘कर्णा, तुझा विजय असो.’ म्हणत दुर्योधनाने भर
...more