त्या आज्ञेने सारी सभा जागच्या जागी थिजून गेली. दास पुढे सरसावलेले पाहताच युधिष्ठिराने आपली राजभूषणे उतरवली. वस्त्रे सोडून ठेवली, इतर पांडवांनी त्याचे अनुकरण केले. पतींची ती केविलवाणी अवस्था पाहून द्रौपदीने डोळ्यांवर हात घेतले. द्रौपदीच्या त्या कृतीने कर्णाचे लक्ष तिच्यावर खिळले. त्याने दुःशासनाला आज्ञा केली, ‘दु:शासना! हे दास जसे विवस्त्र झाले, तसेच या पांचालीला विवस्त्र कर! राजहंसी कशी असते, ते आज या सूतपुत्राला पाहायचंय्. सामान्य स्त्रीपेक्षा राजस्त्री केवढी वेगळी असते, हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. पाहतोस काय? त्या एकवस्त्रेला विवस्त्र कर!’ आधीच चेतनाशून्य बनलेले भीष्म, विदुर त्या
...more