‘तेच सांगत आहे. माझ्या प्रथम पत्नी ऊर्मिलेला दोन पुत्र. शत्रुंजय आणि वृषकेतु. पण वृषकेतु लहान असतानाच ऊर्मिलेनं या जगाचा निरोप घेतला. माझा वृषालीशी विवाह झाला. त्यानंतर मी या नगरीच्या रक्षणार्थ इकडं आलो. पण वृषकेतु राधाईनं ठेवून घेतला. माझी आठवण, म्हणून.’ ‘आणि शत्रुंजय?’ ‘तो युवराज दुर्योधनपुत्रांच्या सहवासात वाढत आहे.’