रथावर भगवा ध्वज गरुड-चिह्नासह तिरप्या सूर्यकिरणांत झळकत होता. दुर्योधनाचे रथाचिह्न रत्नजडित गज होते. गरुड-चिह्न पाहून कर्णाची उत्सुकता वाढली. कर्ण रथाजवळ येत आहे, हे पाहताच रथसेवक सामोरा आला. कर्णाला प्रणाम करून त्याने सांगितले, ‘द्वारकाधीश कृष्णमहाराज आपली वाट पाहत आहेत.’