‘कर्णा, माझं ऐक! अजून वेळ गेलेली नाही.’ ‘नाही, रे कृष्णा! ती वेळ केव्हाच हरवली. शस्त्र-स्पर्धेच्या वेळी माझा अपमान झाला. कृपाचार्यांनी माझं कुल विचारलं, तेव्हा कुंती मातेनं सांगायला हवं होतं. ती वेळ होती. भर स्वयंवरात द्रौपदीनं माझा सूतपुत्र म्हणून उपहास केला होता, तेव्हा तू सांगायला हवं होतंस. ती वेळी होती...’ ‘पण अजून काही घडलं नाही.’ ‘असं आपल्याला वाटतं. पांडवांचं हित पाहत असता, दुर्योधनाकडं मात्र आपलं दुर्लक्ष होतं.’ ‘मला त्याच्याकडं पाहायचं कारण?’ ‘काही नाही; पण मला तसं वागता येईल? बाळपणापासून स्नेह लाभला, तो त्याचा. त्यात कधीही दुरावा आला नाही. शस्त्र-स्पर्धेच्या वेळी जे मातेला जमलं
...more