‘त्यात माझं कसलं कौतुक!’ कर्णाने हसून साथ दिली. ‘आपलं अलौकिक सारथ्य ही आपण आत्मसात केलेली कला आहे. मी तर सूतकुलात वाढलेला. सारथ्य आणि रथपरीक्षा हे दोन्ही आमचे सहजस्वभावच बनलेले असतात.’ ‘तेही भाग्य मोठंच! कर्णा, वासनांचे अश्व जीवनाच्या रथाला जुंपले असता, तो रथ सदैव कह्यात ठेवणं ही सामान्य गोष्ट नव्हे.’