‘हां! आहे मान्य! ऐक, शकुने, जिचे नेत्र शरदऋतूतील कमलदलासारखे आहेत, जिच्या अंगाला शरत्कालीन कमलांचा गंध येतो, जिचे काळे व कुरळे केस विपुल व सुदीर्घ आहेत, जिचा मध्यभाग यज्ञवेदीप्रमाणे रेखीव आहे अन् जिच्या अंगावर विरळ केस आहेत, अशा बुद्धिमती, कलंकविधुरा सर्वांगसुंदर द्रौपदीचा पण लावून मी तुझ्याशी द्यूत खेळतो.’