‘आत्मघात?’ धृतराष्ट्र उद्गारले. ‘हो! आत्मघात! त्याखेरीज दुसरा मार्ग नाही. तात, तो विचार मनात आला, तरी मनातच ठेवा. त्याचा उच्चार करू नका. या तुमच्या विश्वसनीय राजसभेत बोलली जाणारी प्रत्येक गोष्ट पांडवांच्या महालात प्रतिध्वनीच्या रूपानं उमटते. इथं तुमच्या बाजुचं कोणीच नाही. ज्यासाठी तुमचा माझ्यावर कोप झाला होता, ती गोष्ट आज मी सांगतो. राज्याची वाटणी अटळ दिसली, तेव्हा मीच पांडवांना जतुगृहात जाळून मारण्याचा कट रचला. पुरोचनाकरवी मी लाक्षागृह उभारलं, पण ज्या दिवशी पांडव त्या घरात प्रवेश करते झाले, त्याच दिवशी त्यांना सावध करणारे संदेश याच प्रासादातून गेले.’ ‘युवराज!’ विदुर कासावीस झाले.
...more