Saurabh L

39%
Flag icon
‘कृष्णा, फार उशीर झाला. जे घडू नये, ते केव्हाच घडून गेलंय्. मी एकवस्त्रा, पण पुरुष म्हणवून घेणाऱ्यांनी ती अवस्था जाणली नाही. प्रत्यक्ष पतींनीच मी अशा अवस्थेत राजसभेत यावं, असा आग्रह धरला. त्या दुःशासनानं अंत:पुरात प्रवेश करून माझ्या केसांना धरून फरफटत आणलं. कृष्णा, मी यज्ञसेन द्रुपदकन्या. मला या सभेत ओढून आणलं जातं अन् त्याची लाज कुणालाही वाटत नाही!’ आपले मृदू, नीलवर्णीय कुरळे केस डाव्या हातात धरून ते कृष्णासमोर दाखवीत द्रौपदी म्हणाली, ‘मधुसूदना, या केसांची लाज तू बाळग. दुःशासनानं ओढलेला हा केशपाश कधीही विसरू नकोस. कृष्णा, या सभेत काय घडलं नाही? या सभेत नेत्रसंकेत झाले. उघडी मांडी दाखवली गेली. ...more
राधेय
Rate this book
Clear rating