‘वसू! द्रोणाचार्यांनी खूप पराक्रम केला. युद्धाच्या सुरुवातीलाच त्यांनी विराटाचा आणि दुपदाचा वध केला. फार वर्षांपासून मनात रुजलेलं द्रुपदाचं वैर साधलं गेलं. पित्याच्या वधानं धृष्टद्युम्न खदिरांगारासारखा पेटला. तो द्रोणाचार्यांना रणभूमीवर शोधीत होता अन् त्याच वेळी अश्वत्थामा पडल्याची वदंता उठली.’ ‘अश्वत्थामा पडले?’ ‘तो मृत्युंजय! त्याला कोण मारणार? भीमानं अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला ती बातमी स्वत: जाऊन द्रोणांना सांगितली. अश्वत्थामा मारला गेला, एवढंच सांगितलं. द्रोणांनी सत्यवता म्हणून युधिष्ठिराला विचारलं अन् सत्यवक्त्या युधिष्ठिरानं असत्याची कास धरून ती वार्ता खरी असलतची ग्वाही दिली.
...more