सर्वांच्या पुढे आलेल्या चक्रधराला कर्णाने विचारले, ‘आज पितामह पराक्रमाची शर्थ करतात ना?’ ‘हो! त्यांच्या पराक्रमाला तोड नव्हती. आजचा सूर्यास्त पांडवांनी पाहिला नसता.’ ‘चक्रधर!’ ‘भीष्मांच्या समोर पांडवांनी शिखंडीला आणलं. भीष्मांनी शस्र खाली ठेवलं अन् शिखंडीमागून अर्जुनानं...’ ‘भीष्मांचा वध केला? ‘नाही. पितामह धारातीर्थी पडले आहेत. ते स्वेच्छामरणी आहेत. सध्या दक्षिणायन सुरू आहे. उत्तरायणापर्यंत जीव धारण करण्याचा त्यांचा निग्रह आहे.’ ‘पितामहांना शिबिरात आणलं?’ ‘नाही. रणांगणावर जिथं ते पडले, तिथंच ते विश्रांती घेत आहेत. शरीरात घुसलेले बाणही काढण्यास त्यांनी नकार दिला आहे. दुर्योधन महाराजांनी
...more