‘अर्जुना, थोडा थांब! माझ्या रथाचं चक्र या भूमीत फसलंय्?, ते काढण्याचा अवधी मला दे. रथचक्र भूमीनं ग्रासलं असता युद्ध करणं हा धर्म नव्हे! माझा रथ सज्ज होऊ दे. म्हणशील त्या आयुधानं आपण युद्ध करू. ते युद्ध धर्ममान्य असेल. त्यात लाभलेला जय अथवा पराजय कीर्तिरूपच होईल.’ कर्णाची ती अवस्था अर्जुनाला दिसत होती. त्या नि:शस्त्र कर्णावर शरसंधान करण्याचं धाष्टर्य अर्जुनाला होईना. कृष्णाने अर्जुनाची ती अवस्था जाणली. प्रसंगाचे गांभीर्य ध्यानी आले. कर्णाला तो उच्चरवाने म्हणाला, ‘राधया, फारर लौकर तुला धर्माची आठवण झाली! जव्हा एकवस्त्रा द्रौपदी राजसभेत खेचून आणली, तेव्हा विवस्त्र करण्याचा संकेत करताना ही
...more