तिच्या रूपाबद्दल जे ऐकले होते, त्यात तसूभरही कमतरता नव्हती. किंबहुना त्या वर्णनातच कमतरता होती. द्रौपदीच्या त्या सावळ्या रूपाने साऱ्यांनाच भारावून टाकले. तिचे नेत्र कमलदलासारखे होते. धनुष्याशी स्पर्धा कराव्यात, अशा वक्र भुवया तिला लाभल्या होत्या. साक्षात दुर्गा मानवी रूपाने प्रगटली, की काय, असा भास साऱ्यांना होत होता.