‘संयमाच्या कक्षा यानीच ओलांडल्या, तिथं मी त्यांचं पालन काय करणार? ज्या जरासंधाचं पाठबळ सदैव कौरवांच्या पाठीशी होतं ज्याच्या पराक्रमापुढं कृष्णाला हार घेऊन द्वारकेला पळालं लागलं, त्या जरासंधाचा वध कपटानं एकाकी गाठून त्या कृष्णानं करवला... अन् ज्या शिशुपालानं भीमाच आपल्या राज्यात स्वागत केलं, आदरानं करभार दिला, त्याचा सत्यावक्तेपणापायी गेलेला बळी या आमच्या थोर महात्म्यानं पाहिला. कौरवांच्या प्रतिष्ठेपायी चेदिराज शिशुपालावा वध झाला अन् कौरवांच्या साम्राज्याची धुरा वाहणाऱ्यात या आपल्या तिघां सल्लागारांनी ते चुपचाप सहन केलं. पांडवांच्या साम्राज्यापदाला आचार्य द्रोणांनी आशीर्वाद दिले. कौरवसभेत
...more