कर्णाकडे पाहून कृष्ण जाण्यासाठी वळला. कर्ण त्वरेने उठला. त्याने हाक मारली, ‘कृष्णा S S’ कृष्ण थांबला. वळला. तो कर्णाकडे पाहत होता. त्या कृष्णरूपाला निरखीत कर्ण पुढे झाला. कर्णाचे अश्रु तसेच गालांवरून ओघळत होते, ते भरले नेत्र टिपण्याचेही भान कर्णाला नव्हते. कृष्णाच्या मुखावर मंदस्मित उमटले. त्याचा उजवा हात उंचावला गेला. त्या हाताने कर्णाचे अश्रु हळुवार निपटले गेले. कृष्णकृतीने कर्णाला अधिकच उमाळा दाटून आला आणि त्याच वेळी तो कृष्णाच्या मिठीत बद्ध झाला. क्षणभर कृष्णाचे हात कर्णाच्या पाठीवर विसावले. दुसऱ्या क्षणी कृष्ण मिठीतून दूर झाला. त्याचा उजवा हात कर्णाच्या खांद्यावर स्थिरावला. डोळे कर्णावर
...more