‘युवराज, तो भीम मुळातच संतापी. त्याच्या बोलण्याकडं लक्ष न देता क्षमाभाव जागृत करावा. जिथं यज्ञ होणार आहे, त्या भूमीत क्रोध, मत्सर, अपमान यांना स्थान नसतं.’ भीष्म म्हणाले. कर्णाच्या चेहऱ्यावर उद्वेगजन्य स्मित पसरले. तो भीष्मांना म्हणाला, ‘पितामह, हा विचार योग्य आहे, तर तो शिशुपालवधाआधी कृष्णाला का दिला नाहीत? ती यज्ञभूमी सज्ज होत असतानाच त्या भूमीवर रक्त का सांडू दिलंत? का तिथं नरबलीची आवश्यकता होती?’ भीष्म काही बोलले नाहीत. भीमाच्या त्या निरोपाने कर्णाचा संताप उसळला. तो उभा राहिला. ‘सामोपचारानं आमंत्रण पाठवलं, तर हा निरोप? वनवास भोगत असतानाही रणयज्ञात सर्व कौरवांची आहुती घालण्याचा संदेश पांडव
...more