साऱ्यांनाच जीवनात अशी फुंकर थोडीच लाभते? अग्नी प्रज्वलित करण्याला फुंकर मारावी लागते तीच फुंकर समईची ज्योत शांत करते. तसं पहिलं, तर मानवी देह हीच एक विधात्यानं घडवलेली बासरी आहे. त्याच्या एका फुंकरीन सजीव बनलेल्या देह. मातेच्या श्वासानी जपलेला. त्या बोटाच्या जपणूखाली सुखावलेला. बाल्यावस्थेतल्या अवखळ सुरांना केव्हातरी प्रौढत्वाचा स्थिर सूर सापडतो. तारुण्यानं घातलेल्या फुंकरीनं उन्मादक सुरांची आठवण याच बासरीतून होते. आणि वार्धाक्याच्या विकल श्वासांनी तीच बासरी अस्थिर सुरांची धनी बनते. तो सुर केव्हा तुटले कशानं तूटेल, याची भीती बाळगीत असता, कालाच्या एका धीट फुंकरीनं सारे सूर विरून जातात: कायमचे,
...more