मध्यान्ह ढळली होती. अशा अपराह्मण काळी कर्ण नदीतीरावर पुरश्चरण संपवून दानाला उभा राहत असे. याचकांच्या बाबतीत शत्रू, मित्र असा भेद त्याने कधी मानला नव्हता. जीवनातल सर्वात मोठे दान करण्यासाठी कर्ण सिद्ध झाला होता. अर्जुनाचा नेम चुकू नये, म्हणून त्याने आपली रुंद छाती किंचित कलती केली. ‘स ऽ प्ऽ ऽ’ विद्युल्लता दिसावी, तसे त्या बाणाचे क्षणदर्शन झाले. एक भयंकर वेदना मानतून आरपार गेली. रथ उचलण्यासाठी जमिनीला टेकवून तणावलेले हात सैल पडले. रथछायेत पडलेल्या कर्णाने पाहिले, तो अर्जुनाचा रथ वेगाने दूर जात होता. निळा शेला वा-यावर तरंगत रणभूमीवर उतरत होता. त्या शेल्याकडे पाहत-पाहत थकलेल्या कर्णाने नेत्र
...more