‘तसं नाही, वृषाली...देवानं देऊनच माणसाचं जीवन समृद्ध होता नाही ती कल्पना चुकीची आहे. सामान्यांच्या जीवनात थोडी जरी देवकृपा अवतरली, तरी ते जीवन समृद्ध बनतं. ते खरं असलं, तरी या पृथ्वीतलावर असेही काही महाभाग जन्मतात की, ज्यांच्याकडं परमेश्वर घेण्यासाठी येतो. हक्कानं. त्यातूनच ते जीवन सफल होतं. उजळून निघतं. आज जीवन सफल झाल्याचा आनंद मी भोगीत आहे. सारं ओझं कमी झालं. मनावर काही दडपण राहिलं नाही. बसू, आज मी तृप्त आहे. कृतार्थ आहे.’