More on this book
Community
Kindle Notes & Highlights
त्या बासरीत काही नसते, म्हणे! ती एक शुष्क वेळूची नळी. छिद्रांकित. महत्त्व असते, ते सावधानतेत. त्या नळीत फुंकरीलेल्या फुंकरीला, हळूवार बोटांनी छिद्राना जपण्याला. त्यातूनच मनाचे सूर उमटतात. कृष्णाने सांगितले होते : फुंकर! निर्जीवाला सजीव करणारी, सूर भरणारी फुंकर. साऱ्यांनाच जीवनात अशी फुंकर थोडीच लाभते? अग्नी प्रज्वलित करण्याला फुंकर मारावी लागते तीच फुंकर समईची ज्योत शांत करते. तसं पहिलं, तर मानवी देह हीच एक विधात्यानं घडवलेली बासरी आहे. त्याच्या एका फुंकरीन सजीव बनलेल्या देह. मातेच्या श्वासानी जपलेला. त्या बोटाच्या जपणूखाली सुखावलेला. बाल्यावस्थेतल्या अवखळ सुरांना केव्हातरी प्रौढत्वाचा स्थिर
...more

