More on this book
Kindle Notes & Highlights
भोजन आटोपून, माधवराव जेव्हा परत दिवाणखान्यात आले, तेव्हा चंद्र उगवला होता. माधवराव एकटेच दिवाणखान्यात उभे होते. महिरपी खिडकीतून दिसणारा चंद्रोदय ते पाहत होते. चंद्रप्रकाशात नदीपर्यंतचा मुलूख डोळ्यांत भरला होता. सर्वत्र नि:स्तब्ध शांतता वावरत होती. सारे वातावरण गूढ बनून गेले होते. पडद्याच्या झालेल्या सळसळीने ते भानावर आले. माधवरावांनी चमकून मागे पाहिले.
माधवरावांच्या मस्तकी पागोटे बसवीत असता त्यांचे लक्ष माधवरावांच्या अंगरख्याकडे गेले. त्यांच्या पांढऱ्या शुभ्र अंगरख्यावर छातीजवळ मातीचे डाग पडले होते. ते झटकून राघोबा म्हणाले, ‘‘बघ, तुझ्या अंगरख्यावर डाग पडले!’’ ‘‘राहू दे, काका! ते डाग झटकून जायचे नाहीत!’’ —आणि झरकन वळून माधवराव डेऱ्याबाहेर पडले.

