समुद्रासारखा गुरू नाही. इथं अालं, की मन विशाल होतं. अनेक विचारांच्या लाटा मनाच्या खडकावर फुटू लागतात. माणसानं समुद्रासारखं असावं. समुद्राला पृथ्वी पादाक्रांत होणार नाही, हा अनादिकालाचा अनुभव अाहे. तसं असूनही पराजयाची भीती त्याला माहीत नाही. नेहमी त्याचे हात किनाऱ्याकडे धावत असतात. त्या ईष्र्येत जय-पराजयाचं, भरती-अोहोटीचं सुद्धा त्याला भान राहत नाही... चला.’