सृष्टीला जो नियम, तोच मानवालाही. माणूस का तीवेगळा अाहे? मध्यान्ह काळ झाल्यावर अस्तकालाची वाटचाल करावी लागते, हे का सूर्याला माहीत नाही? भरतीनंतर सागराला अोहोटी येते, हे का सागराला कळत नाही? पौर्णिमेच्या चंद्राला का भावी क्षयाची जाणीव नसते? म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही, सागराच्या भरतीचा वेग मंदावत नाही, ना चंद्राला पौर्णिमेच्या रूपाची भीती वाटते. जीवनाचा अोघ खंडित होत नाही, याचाच हा पुरावा अाहे. हे जीवनचक्र असंच चालायचं. जो नियम सृष्टी पाळते, त्याची जीवानं चिंता कशाला करावी?’