More on this book
Community
Kindle Notes & Highlights
‘शिवाजी धार्मिक होता; पण धर्मभोळा नव्हता. कठोर होता; पण क्रूर नव्हता. साहसी होता; पण अाततायी नव्हता. व्यवहारी होता; पण ध्येयशून्य नव्हता. उच्च ध्येयाची स्वप्ने पाहणारा स्वप्नाळूही. ही स्वप्ने वास्तवात उतरविणारा कठोर वास्तववादी हे त्याचे स्वरूप अाहे. तो साधा राहत नसे. डौलदार, वैभवसंपनन् अशी त्याची राहणी, पण तो डामडौलात उधळ्या नव्हता. परधर्मसहिष्णुता
नेहमी लक्षात ठेवा, लक्ष्मीमागे धावून लक्ष्मी कधी प्रसन्न होत नसते. ती कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागून अापोअाप येत असते. लक्ष्मी नेहमी पाठीशी ठेवावी; अाणि संकटे समोर बघावीत. हे विसरू नका....
भीतीपोटी माणसाच्या हातून काहीही घडत नाही, हे लक्षात ठेवा.’
माणसाला थोडंच यावं; पण त्याला तोड नसावी.’
सौंदर्य मनाच्या स्नेहातून प्रकट होतं. जिव्हाळ्यानं ते ज्ञात होतं. तशा रूपाला तोड नसते.’
‘अाकाशात करोडो नक्षत्रे असूनदेखील एका चंद्राची बरोबरी करू शकत नाहीत ना!...’
मासाहेब, महाभारताचा प्रसंग अाठवा. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं : जिंकलंस, तर पृथ्वीचं राज्य भोगशील; मेलास, तर स्वर्गाचा मानकरी होशील. अाम्ही सल्ला केला, तरी प्राणनाश स्पष्ट दिसतो. युद्ध केलियाने जय जाहलियास उत्तम. प्राण गेला, तरी निदान कीर्ती तरी राहील.’
समुद्रासारखा गुरू नाही. इथं अालं, की मन विशाल होतं. अनेक विचारांच्या लाटा मनाच्या खडकावर फुटू लागतात. माणसानं समुद्रासारखं असावं. समुद्राला पृथ्वी पादाक्रांत होणार नाही, हा अनादिकालाचा अनुभव अाहे. तसं असूनही पराजयाची भीती त्याला माहीत नाही. नेहमी त्याचे हात किनाऱ्याकडे धावत असतात. त्या ईष्र्येत जय-पराजयाचं, भरती-अोहोटीचं सुद्धा त्याला भान राहत नाही... चला.’
खोट्या अहंकारापेक्षा सत्य पारखून घेणं श्रेयस्कर असतं.
‘काही वेळा प्रसंगानुसार यशस्वी शस्त्रंही शमीवृक्षावर ठेवावी लागतात!’
पांडवांना वनवास भोगावा लागला. प्रभू रामचंद्रांनाही तो टळला नाही. जे देवांना टाळता अालं नाही, ते दैव तुम्ही कसं टाळणार? कष्टांना अाणि संकटांना भिणारी माणसं कधी देवांचं राज्य उभं करू शकत नाहीत, राजे!’
राजांच्या नशिबी एकटेपणच असतं.
खुदी को कर बुलंद इतना के हर तहरीरसे पहले खुदा बन्देसे खुद पूछे : बता, तेरी रजा क्या है?
माणसानं स्वत:लाच एवढं सामर्थ्यशाली बनवावं, की दरवेळी ललाटलेख लिहिण्यापूर्वी परमेश्वरानं विचारावं, ‘बाबा, रे, सांग तुझी काय इच्छा अाहे!’
जे संकट सहन करतात, त्यांचाच भविष्यकाल उज्ज्वल असतो. ह्या जगात माणसाचं मोठेपण कर्तृत्वापेक्षा सोसण्यावर अाहे.
जीवन असं जगावं, की उज्ज्वल कीर्तीचा दरवळ सदैव मागे राहावा.’
हजारो काळे फत्तर जेव्हा स्वत:ला पायात गाडून घेतात, तेव्हाच त्यांवर असं संगमरवरी स्वपन् उभं राहतं, अापल्या सौंदर्यात झगमगतं.
युद्ध अाणि प्रेम यांत खर्चाचा हिशेब नसतो.’
जीवनात एखादा मनसुबा असा जमून जातो, की त्याची सोबत अायुष्यभर सुटत नाही.
‘केल्यानें होत अाहे, रे! तें अाधीं केलेंचि पाहिजे.’
स्वत:च्या पराजयाचं जरा कौतुक करा. तेही परमेश्वरी वरदानच असतं. त्यानं पाठविलेली संकटं जे धीरानं सहन करतात, सोसतात, त्यांनाच भविष्यकाळ उज्ज्वल असतो,
‘जीवनातली अपुरी निष्ठा माणसाला अशीच वाहवत नेते.
राजकारणात ‘जर तर’ याला फारसा अर्थ नसतो. प्रत्येक घडीचा निर्णय त्या क्षणाच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. हे जे अोळखतात, तेच राजकारणात यशस्वी होतात.
राजकारणात विचाराला वेळ नसतो. कैक वेळी गमावलेल्या क्षणासाठी अायुष्याचा पश्चात्ताप सहन करीत राहावं लागतं.
परमेश्वरदर्शन हे जीवनाचं ध्येय नव्हे. अध्यात्मालाही ते मान्य नाही. परमेश्वर चराचर स्वरूपामध्ये भरून राहिला अाहे. तो अापल्यातही अाहे. स्व-रूपाची अोळख हेच अापलं ध्येय असायला हवं.
संकटाच्या वेळी देवाला हाक मारण्यापेक्षा, जेव्हा असे सुलक्षणी योग येतात, तेव्हा त्याला अाठवावं.
‘नुसतं शरीर थकून झोप येत नाही. मनही थकावं लागतं, पुतळा! हे मन अाहे ना, ते बेटं मुळीच थकत नाही. उगीच विचारांच्या पाठीमागे अाम्हांला फरफटत नेतं...’
साऱ्या अायुष्यात अाम्ही एकच शिकलो- हे सारं जीवन परावलंबी अाहे. करतो, म्हणून काही साधत नाही. सोसणं, अाणि तेही एकट्यानं, एवढा एकच अर्थ या जीवनाला अाहे. अालेली सुखदु:खं माणूस किती चांगल्या तऱ्हेनं सोसतो, यावरच त्याचं कर्तेपण अवलंबून अाहे.’
‘दुबळ्यांच्या दयेला अाणि दीनांच्या अहिंसेला फारसा अर्थ राहत नाही.
‘ह्या हिऱ्यांना पैलू पाडलेत, राणीसाहेब! नाही तर साधा हिऱ्याचा खडा गारगोटीसारखाच दिसतो. हिऱ्याचं कशाला? मनाचंही तेच अाहे. मन हेदेखील हिऱ्यासारखंच निर्मळ, निष्पाप असतं. त्याला ज्ञानाचे, व्यवहाराचे पैलू पडले, तरच ते प्रकाशित होतं.’
ही दु:खं अशी असतात, की ज्यांची त्यांनीच सोसायची असतात. त्यांत वाटेकरी होतो म्हटलं, तरी होता येत नाही.’
सृष्टीला जो नियम, तोच मानवालाही. माणूस का तीवेगळा अाहे? मध्यान्ह काळ झाल्यावर अस्तकालाची वाटचाल करावी लागते, हे का सूर्याला माहीत नाही? भरतीनंतर सागराला अोहोटी येते, हे का सागराला कळत नाही? पौर्णिमेच्या चंद्राला का भावी क्षयाची जाणीव नसते? म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही, सागराच्या भरतीचा वेग मंदावत नाही, ना चंद्राला पौर्णिमेच्या रूपाची भीती वाटते. जीवनाचा अोघ खंडित होत नाही, याचाच हा पुरावा अाहे. हे जीवनचक्र असंच चालायचं. जो नियम सृष्टी पाळते, त्याची जीवानं चिंता कशाला करावी?’
ज्यांना पराजयाची भीती नसते, तेच विजयश्री संपादन करू शकतात...
अाम्ही कधी हरलो, तर तुमच्या प्रेमापोटीच हरू! अाम्हांला पराजित करण्याची शक्ती दुसऱ्या कोणात नाही.’
स्वाभिमान जरूर असावा; पण तो स्वकीयांच्या नाशाला केव्हाही कारणीभूत न व्हावा. स्वकीयांच्या बाबतीत क्षमा हीच सदैव अाठवावी.’
राजकारण भावनेवर चालत नसतं; त्याला बुद्धीचं बळ असावं लागतं.
एक माणूस जातं, पण केवढं रितेपण निर्माण करून!’
अापल्या माणसांना शिक्षेएवजी क्षमा करणं हेच योग्य.’
‘जीवनात ह्या मर्यादांना फार मोठा अर्थ अाहे, नाही? थोडी मर्यादा चुकली, तर केवढा अनर्थ होतो! सीतेच्या ध्यानी हे अालं नाही. भिक्षा घालण्याचं पुण्यकर्म करण्यासाठी सीतेनं मर्यादा अोलांडली; अाणि रावणानं तिचं हरण केलं.’
स्वत:ला फसविण्यातदेखील केवढा अानंद असतो! स्वत:च्या लोभाला केवढं सुंदर अावरण!
‘मोह! त्यालादेखील अाधार लागतो. अामच्या शब्दाखातर जीव वेचायला तयार होणारे हजारो अाम्ही तयार केले. पण अामच्या जिवाच्या जपणुकीसाठी तळमळणारा जीव अाम्हांला तयार करता अाला नाही. कदाचित तो विश्वास अाम्हांला देता अाला नसेल.
संतापाने बुद्धीवरचा ताबा नष्ट होतो.
माणूस अापली कीव करण्यात भारी रमतो. खोटी कीव करून घेण्याची सवय जडली, की ती व्यसनापेक्षाही भयंकर बनते.
‘पुतळा! तू भारी सरळ अाहेस. तुला असं वाटणं स्वाभाविक अाहे. पण निसर्ग तसा नाही. काही क्षणभरच धरणीकंप होतो; पण त्या क्षणांत माणसानं उभारलेले सारे इमले कायमचे कमजोर बनून जातात. त्यांचा भरवसा देता येत नाही. त्यांत वावरत असतानादेखील जीव घाबरतो. अशा वेळी जिवाला सोबत लागते दुसऱ्या जिवाची; कोसळणाऱ्या घराची नव्हे.’
सूर्यदेव म्हणजे साक्षात तेज; पण त्यालादेखील ग्रहण लागतं, नाही? मग सामान्यांची काय कथा?
चालणाऱ्या माणसाला केव्हा तरी एक-दोनदा पडावं लागतं, ठेचकळावं लागतं. तितकंच चुकांचं स्थान जीवनात अाहे.