‘मग सद़ुरूला जीवनात काहीच का अर्थ नाही?’ राजांनी विचारले. ‘राजे, तुम्ही अनेक वेळा अनोख्या मुलुखातून गेला असाल, वाट चुकला असाल. वाटेवर कोणीतरी पांथस्थ भेटतो. त्याला तुम्ही मार्ग विचारता. तो सांगतो, त्या वाटेनं तुम्ही जाता. तुमच्या मनात असा संशय कधी येतो का, की त्या माणसानं आपल्याला खोटी वाट दाखविली असेल, म्हणून? त्या पांथस्थाची जीवनात जी जागा, तीच गुरूची, वाट तुम्हीच चालायची असते. मुक्कामही तुम्हीच गाठायचा असतो. तसं पाहिलं, तर आता आपण दोघंही एका मार्गाचे प्रवासी. ज्याला आधी सापडेल, त्यानं दुसऱ्याला सांगावं, एवढ्याचपुरते आपण बद्ध.’