‘मुळीच नाही. आमच्यांत आणि राजांमध्ये फारच फरक. आम्ही राजभोगी, तर ते राजयोगी! पाहा ना... आम्ही पराक्रम करतो; पण त्याचबरोबर आम्ही स्वत:ला विसरू शकत नाही. उपभोगाची वासना सुटत नाही. मोहिमेतून मोकळं होताच आम्ही विलासांकडे झुकतो. पण राजे पाहा! पराक्रमाबरोबरच ते सदैव राज्यकारभाराशी निगडित आहेत. त्यांच्यांत आदर्श राजांचे गुण पुरेपूर उतरलेत. म्हणूनच जयश्री त्यांना सदैव माळ घालते. अफझलखानासारख्या संकटातून सुटून जाणं हे काही सामान्य नव्हे!’