More on this book
Community
Kindle Notes & Highlights
‘मुळीच नाही. आमच्यांत आणि राजांमध्ये फारच फरक. आम्ही राजभोगी, तर ते राजयोगी! पाहा ना... आम्ही पराक्रम करतो; पण त्याचबरोबर आम्ही स्वत:ला विसरू शकत नाही. उपभोगाची वासना सुटत नाही. मोहिमेतून मोकळं होताच आम्ही विलासांकडे झुकतो. पण राजे पाहा! पराक्रमाबरोबरच ते सदैव राज्यकारभाराशी निगडित आहेत. त्यांच्यांत आदर्श राजांचे गुण पुरेपूर उतरलेत. म्हणूनच जयश्री त्यांना सदैव माळ घालते. अफझलखानासारख्या संकटातून सुटून जाणं हे काही सामान्य नव्हे!’
‘मासाहेब, बैरागी होणं केवढं कर्मकठीण! दारासमोर उभं राहून ‘भिक्षा वाढा,’ हे शब्द गळ्याशी आणणं हीच एक मोठी तपश्चर्या आहे.’
‘निश्चयाचा महामेरू। बहुत जनांस आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।१।। परोपकाराचिया राशी। उदंड घडती जयाशीं। जयाचे गुणमहत्त्वाशीं। तुळणा कैशी।।२।। नरपति हयपति। गजपति गडपति। पुरंधर आणि शक्ती। पृष्ठभागीं।।३।। यशवंत कीर्तिवंत। सामर्थ्यवंत वरदवंत। पुण्यवंत आणि जयवंत। जाणता राजा।।४।। आचारशील विचारशील। दानशील धर्मशील। सर्वज्ञपणें सुशील। सर्वां ठायीं।।५।। धीर उदार सुंदर। शूरक्रीयेसी तत्पर। सावधपणेंसी नृपवर। तुच्छ केले।।६।। तीर्थक्षेत्रें तीं मोडिलीं। ब्राह्मणस्थानें बिघडलीं। सकळ पृथ्वी आंदोळली। धर्म गेला।।७।। देवधर्म गोब्राह्मण। करावयासि रक्षण। हृदयस्थ झाला नारायण। प्रेरणा केली।।८।।
उदंड पंडित पुराणिक। कवीश्वर याज्ञिक वैदिक। धूर्त तार्किक सभानायक। तुमचे ठायीं।।९।। या भूमंडळाचे ठायीं। धर्म रक्षी ऐसा नाहीं। महाराष्ट्रधर्म राहिला कांहीं। तुम्हां करितां।।१०।। आणखी कांहीं धर्म चालती। श्रीमंत होऊनि कित्येक असती। धन्य धन्य तुमची कीर्ति। विस्तारली।।११।। कित्येत दुष्ट संहारिले। कित्येकांस धाक सुटले। कित्येकांसी आश्रय झाले। शिवकल्याण राजा।।१२।। तुमचे देशीं वास्तव्य केलें। परंतू वर्तमान नाहीं घेतलें। ॠणानुबंधे विस्मरण जाहलें। बा काय नेणूं।।१३।।’
‘मग सद़ुरूला जीवनात काहीच का अर्थ नाही?’ राजांनी विचारले. ‘राजे, तुम्ही अनेक वेळा अनोख्या मुलुखातून गेला असाल, वाट चुकला असाल. वाटेवर कोणीतरी पांथस्थ भेटतो. त्याला तुम्ही मार्ग विचारता. तो सांगतो, त्या वाटेनं तुम्ही जाता. तुमच्या मनात असा संशय कधी येतो का, की त्या माणसानं आपल्याला खोटी वाट दाखविली असेल, म्हणून? त्या पांथस्थाची जीवनात जी जागा, तीच गुरूची, वाट तुम्हीच चालायची असते. मुक्कामही तुम्हीच गाठायचा असतो. तसं पाहिलं, तर आता आपण दोघंही एका मार्गाचे प्रवासी. ज्याला आधी सापडेल, त्यानं दुसऱ्याला सांगावं, एवढ्याचपुरते आपण बद्ध.’
या धरतीवर श्रींचं राज्य प्रस्थापित व्हावं, हे तुमचं ध्येय. ते काम श्रद्धेनं, प्रेमानं करणं हीच ईश्वरसेवा नाही का? राजे, सर्वांभूती प्रेम बाळगा. प्रजेवर उदंड प्रेम करा. धर्माची लाज राखा. महाराष्ट्रधर्म वाढवा. हीच तुमची तपश्चर्या. तिनंच तुम्हांला ईश्वर पावेल.’
खुदी को कर बुलंद इतना के हर तहरीरसे पहले खुदा बंदेसे खुद पूछे- बता तेरी र.जा क्या है?
‘आमच्या मस्तकी तुम्ही असलात, तरी चारचौघांत ते झाकण्यासाठी शिरोभूषण हवं ना!’
‘मासाहेब, आम्ही आपल्या पदराखाली लहानाचे मोठे झालो. आपल्या आशीर्वादानं आजचा दिवस दिसला. हाती सत्ता असती आणि पृथ्वीचं दान केलं असतं, तरी ते अपुरं पडावं, ही आपली योग्यता! एक धर्मविधी म्हणूनच ही वस्त्रं आपल्या चरणी आम्ही वाहतो. त्यांना हात लावा.’
‘ह्या हिऱ्यांना पैलू पाडलेत, राणीसाहेब! नाही तर साधा हिऱ्याचा खडा गारगोटीसारखाच दिसतो. हिऱ्याचं कशाला? मनाचंही तेच आहे. मन हेदेखील हिऱ्यासारखंच निर्मळ, निष्पाप असतं. त्याला ज्ञानाचे, व्यवहाराचे पैलू पडले, तरच ते प्रकाशित होतं.’
आजानुबाहू
जिवाला जीव देणारी माणसं. वेळ का सांगून येते? घात, अपघात होतात. चुकून पाऊल फसतं. करमणुकीपायी असे मोहरे खर्ची टाकण्याची सवय आम्हांला नाही. आपल्या इच्छेखातर आम्ही येसाजीला पाठवला; पण तो माघारी येईपर्यंत आमच्या जिवात जीव नव्हता.’ त्या बोलांनी तानाशहांना राजांचे एक नवे दर्शन घडले.