YAYATI (Marathi)
Rate it:
Read between October 5 - October 8, 2019
1%
Flag icon
जखम उघडी करून दाखविली, म्हणजे माणसाचे दुःख हलके होते. कुणी जवळ बसून विचारपूस केली, की आजाऱ्याला बरे वाटते. आपुलकीच्या अश्रूंनी दुर्दैवी माणसाच्या मनातला वणवा विझतो.
1%
Flag icon
जग चुकते, त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही! प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वतःला झालेल्या जखमांनी.
2%
Flag icon
आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही, असे वाटते, त्यातच खोल अर्थ भरलेला आहे, असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते.
2%
Flag icon
शब्दापेक्षा स्पर्श अधिक बोलका असतो. पण त्याला काही माणसाच्या काळजाला हात घालता येत नाही. ते काम अश्रूंनाच साधते.
5%
Flag icon
जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही. ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही. तो इतरांचा पराभव करून जगतो. मनुष्य या जगात जी धडपड करतो, ती भोगासाठी! त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही! ते रणांगण आहे.’
6%
Flag icon
‘जगात सर्व गोष्टी योग्य वेळी माणसाला कळतात. झाडांना काही पानांबरोबर फुलं आणि फुलांबरोबर फळं येत नाहीत.’
11%
Flag icon
जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोपं नाही!’
13%
Flag icon
जीवन असं आहे. ते सुंदर आहे. मधुर आहे; पण त्याला केव्हा कुठून कीड लागेल, याचा नेम नसतो!’
13%
Flag icon
‘या जगात गोड फळांनाच कीड लागण्याचा अधिक संभव असतो!’
13%
Flag icon
ज्या मनुष्यात काही विशेष गुण असतात, वृत्तीची विलक्षण उत्कटता असते, त्यांनी या गोड फळापासून बोध घेतला पाहिजे. स्वतःला जपायला शिकलं पाहिजे,
14%
Flag icon
पण या जगात उपभोगापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा आनंद आहे.’ ‘कोणता?’ ‘त्यागाचा!’
24%
Flag icon
या जगात जो तो आपापल्याकरिता जगतो, हेच खरे.
24%
Flag icon
वृक्षवेलींची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात, तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रीती म्हणते, कधी मैत्री म्हणते; पण खरोखरच ते आत्मप्रेमच असते. एका बाजूचा ओलावा नाहीसा झाला, तर वृक्षवेली सुकून जात नाहीत; त्यांची मुळे दुसऱ्या बाजूला कुठे ओलावा आहे— मग तो जवळ असो, नाही तर दूर असो-हे पाहू लागतात. तो शोधून ती टवटवीत राहतात.
36%
Flag icon
जीवन नेहमीच अपूर्ण असतं. तसं ते असण्यातच त्याची गोडी साठवलेली आहे!’
36%
Flag icon
‘माणसाचा प्रेमभंग होण्यापेक्षा त्याचं मुळातच कुणावर प्रेम न जडणं बरं नव्हे का?’ तो हसून उत्तरला, ‘छे! प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे पाहायची शक्ती देतं. ते प्रेम कुणावरही असो, ते कशावरही जडलेलं असो. मात्र ते खरंखुरं प्रेम असायला हवं! ते हृदयाच्या गाभ्यातून उमलायला हवं! ते स्वार्थी, लोभी, किवा फसवं असता कामा नये. राजकन्ये, खरं प्रेम नेहमीच निःस्वार्थी असतं. निरपेक्ष असतं; मग ते फुलांवरलं असो, प्राण्यावरलं असो, सृष्टिसौंदर्यावरलं असो, आईबापांवरलं असो, प्रियकर किंवा प्रेयसी यांच्यावरलं असो, कुल, ज्ञाती, राष्ट्र यांच्यापैकी कुणावरलंही असो; निःस्वार्थी, निरपेक्ष, निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या ...more
36%
Flag icon
आमचं प्रेम सफल झालं नाही, म्हणून दुःख करू नकोस. प्रेम लाभलं नसलं, तरी प्रेमाचा अनुभव मला मिळाला आहे. त्याची स्मृती मी जन्मभर जपून ठेवीन.
36%
Flag icon
तिच्या या सर्व दोषांची जाणीव आहे मला! तिच्या रूपानं मोहून जाऊन केवळ अंधळेपणानं मी तिच्यावर प्रेम केलं नाही, प्रिय व्यक्तीचा तिच्या दोषांसह स्वीकार करण्याची शक्ती खऱ्या प्रेमाच्या अंगी असते— असली पाहिजे!
36%
Flag icon
जीवनात प्रेम ही एक उच्च भावना आहे, पण कर्तव्य ही तिच्यापेक्षाही श्रेष्ठ अशी भावना आहे! कर्तव्याला कठोर व्हावं लागतं.
52%
Flag icon
‘मानवी जीवनात आत्या हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी आणि मन हा लगाम आहे.
53%
Flag icon
सुखापेक्षा दुःखातच माणसं अधिक जवळ येतात,