More on this book
Community
Kindle Notes & Highlights
जग चुकते, त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही! प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वतःला झालेल्या जखमांनी.
त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही! ते रणांगण आहे.’
मध्यरात्री लखलखणाऱ्या नक्षत्रांकडे टक लावून पाहत बसण्यात जो आनंद आहे, तो काही ही आकाशातली झुंबरे फोडून त्यांतल्या दीपज्योती विझविण्यात नाही.
पण कुठल्याही गोष्टीचे मोल ती हरवल्यानंतरच आपल्याला कळते.
मृत्यू हा अष्टौप्रहर अश्वमेध करणारा विजयी सम्राट आहे; याला या जगात कोणीही विरोध करू शकत नाही,
प्रत्येक वर्णाने इतर वर्णांचे गुण आत्मसात करण्यात कोणती हानी आहे! अनेक नद्यांचे पाणी एकत्रित करूनच आपण आराध्यदेवतेला अभिषेक करीत असतो.
ज्ञान हा मानवाला मिळणारा वर आहे, की शाप आहे?
या जगात जो तो आपापल्याकरिता जगतो, हेच खरे.
वृक्षवेलींची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात, तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रीती म्हणते, कधी मैत्री म्हणते; पण खरोखरच ते आत्मप्रेमच असते.
जगातलं तत्त्वज्ञान दुसऱ्याला सांगण्याकरिताच असतं, की काय,
आईबापांचं मन कळायला आईबापच व्हावं लागतं!
कुणाचंही दुःख असो, ते कळण्याचा मार्ग या जगात एकच आहे, तो म्हणजे त्याच्या जागी आपण आहो, अशी कल्पना करणं हा!
समुद्रमंथनातून अमृत बाहेर येताना पाहून देव-दैत्यांना काय आनंद झाला असेल, याची कल्पना पूरूच्या तोंडातून एकेक अक्षर बाहेर पडू लागले,
‘महाराज, जीवनाच्या जमाखर्चात उधारीला जागा नाही. जो आज सुगंधी फुलांचा वास घेत नाही, त्याला तो उद्या मिळेलच, असे नाही. या जगात उद्याची सोनेरी सकाळ उगवेल! उद्याची सुगंधी फुले फुलतील! पण त्या उद्याच्या जगात हा वास घेणाराच असणार नाही!’
उपभोग घेऊन वासना कधीही तृप्त होत नाही. आहुतींनी अग्नी जसा अधिकच भडकतो, तशी उपभोगाने वासनेची भूक अधिक वाढते!