ययातीला देवयानी आणि शर्मिष्ठा या दोन सुंदर तरुणींच्या सहवाससुखाचा लाभ झाला होता; पण तेवढ्याने त्याची तृप्ती कुठे झाली? इंद्रियसुखांच्या बाबतीतली चिरंतन अतृप्ती हा मानवी मनाचा अत्यंत दुर्बल भाग आहे. एका साध्या उपाख्यानाच्या द्वारे या सनातन समस्येवर बोट ठेवण्यातच महाभारतकारांच्या प्रज्ञेचे स्वरूप पूर्णपणे प्रगट झाले आहे.