चोवीस तास कुठल्या तरी फुसक्या सुखात मन गुंतवून ठेवण्याखेरीज आनंदाचा दुसरा मार्ग त्याला आढळत नाही. आत्मानंद ही भावनाच त्याला अपरिचित होऊन बसली आहे. अंतर्मुख होऊन एकांतात केलेले स्वतःविषयीचे आणि जीवनाविषयीचे चिंतन ही त्याच्या दृष्टीने मृगजळात लावलेल्या कल्पवृक्षाच्या फुलांची वंध्याकन्येने गुंफलेली माळ झाली आहे!