तिथे अष्टौप्रहर मला मैत्रीण हवी होती. जिच्याशी बोलून, जिची थट्टा करून, जिला आपले हृद्गत सांगून, मी माझे दुःख हलके करू शकेन, अशी मैत्रीण मला हवी होती. जिच्या मांडीची उशी करून मी शांतपणे झोपी गेल्यावर पायाला विंचू चावला, तरी माझी झोप मोडेल, या भयाने जी हलणार नाही, अशी मैत्रीण मला हवी होती. जिला माझी सारी सोनेरी स्वप्ने सांगता येतील आणि ती सांगता-सांगता हातून घडलेल्या चुकांची कबुली जिच्यापाशी देता येईल, अशी मैत्रीण मला हवी होती. या निर्जन बेटावर काही खायला मिळाले नाही, तरी आपण एकमेकांच्या ओठांतल्या अमृतावर जगू, असा आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण करणारी मैत्रीण मला हवी होती! मृत्यू मला घेऊन जायला
...more